फैजपूर शहरातील 30 वर्षीय महिलेवर बलात्कार : तरुणाला अटक
Rape of 30-year-old woman in Faizpur city : Youth arrested यावल : फैजपूर शहरातील एका भागातील 30 महिलेवर 26 वर्षीय तरुणाने धमकी देत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्यची बाब उघडकीस आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. फैजपूर पोलीस ठाण्यात संशयिताविरोधात अत्याचाराच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून तरुणाला अटक करण्यात आली.
संबंध उघड करण्याची धमकी देत अत्याचार
फैजपूर शहरातील एका भागात 30 वर्षीय पीडीता वास्तव्यास असून तिच्या तक्रारीनुसार, मंगळवार, 2 मे रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास पीडीता घरात झोपली असताना संशयित शेख आरीफ शेख जाबीर (26) या तरुणाने अनधिकृतरीत्या महिलेच्या घरात प्रवेश करीत जर कुणाला काही सांगितले आणि आवाज काढला तर आपले पूर्वीपासून अनैतिक संबंध आहेत, असे सांगून बदनामीची धमकी देत महिलेवर लैंगिक अत्याचार केला.





पहाटेच तरुणाला अटक
हा प्रकार महिलेने कुटुंबीयांस सांगितल्यानंतर शुक्रवारी पहाटे पूर्वी फैजपूर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करून संशयित शेख आरीफ शेख जाबीर याला पोलिसांनी अटक केली. तपास फैजपूरचे सहायक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर आखेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मोहन लोखंडे, हवलदार चेतन महाजन, हर्षल चौधरी, गुलबक्ष तळवी आदी करीत आहे.
