अट्रावल येथील विवाहितेचा आत्महत्येचा प्रयत्न
Suicide attempt of a married woman in Atraval यावल : तालुक्यातील अट्रावल येथील 38 वर्षीय विवाहितेने राहत्या घरात विषारी पदार्थ प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर तिला तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले. या ठिकाणी तिच्यावर उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर आहे.
नैराश्येतेने उचलले टोकाचे पाऊल
अट्रावल, ता.यावल येथील सविता जितेंद्र कोळी (38) ही विवाहिता आपल्या घरात एकटी असताना नैराश्यातून तिने आपल्या राहत्या घरात विषारी पदार्थ प्राशन केले. हा प्रकार कुटुंबीयांच्या निदर्शनास आल्यानंतर तिला तातडीने उपचारार्थ यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणल्यानंतर डॉ.मोहिनी भुगवाड्या, अधिपरीचारीका दीपाली किरंगे, पिंटू बागुल आदींनी उपचार केले.
