मालोद येथील 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अज्ञाताकडून अपहरण


17-year-old minor girl abducted by unknown persons from Malod यावल : तालुक्यातील मालोद या गावातील 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचे तिच्या राहत्या घरातून अपहरण करण्यात आले. अल्पवयीन तरुणी घरी असतांना तिला अज्ञाताने काहीतरी आमिष देत फूस लावून पळवून नेत अपहरण केले. या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात पीडित अल्पवयीन मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

अज्ञाताविरोधात यावल पोलिसात गुन्हा
मालोद, ता. यावल या गावात 17 वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या घरी असताना तिची आई कामाला गेली होती. दरम्यान अल्पवयीन मुलगी घरी असतांना या अल्पवयीन मुलीला कोणीतरी आमिष दाखवले आणि तिला फुस लावून पळवून नेत तिचे अपहरण केले. हा प्रकार कुटुंबीयांच्या निदर्शनास आल्यानंतर यावल पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !