वड्री येथे जुन्या वादातून तरुणाला मारहाण : दोघांविरोधात गुन्हा दाखल
A young man was beaten up due to an old dispute in Vadri : A case has been registered against both यावल : तालुक्यातील वड्री या गावात आंबेडकर नगर जवळील समाज मंदिराच्या समोर मागील भांडणाच्या कारणावरून एका 32 वर्षीय तरुणाला गावातील दोघांसह भुसावळ येथील काही जणांनी येऊन मारहाण केली. त्याच्या डोक्यात लोखंडी पाईपाने दुखापत केली. या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात दंगलीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
दोघांविरोधात गुन्हा दाखल
वड्री, ता.यावल या गावातील रहिवासी गोपाळ नामदेव खैरनार (32) यांनी यावल पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार, जुन्या भांडणाच्या कारणांवरून वड्री गावातील आंबेडकर नगरातील समाज मंदिराच्या समोर गावातील प्रमोद रघुनाथ डोंगरे, सुजाता प्रमोद डोंगरे (दोन्ही राहणार वड्री) व पियुष सपकाळे राहणार (भुसावळ) यांच्यासोबत आलेल्या काही अज्ञात व्यक्तींनी त्यांना मारहाण केली तसेच त्यांच्या पत्नीला देखील वीट फेकून मारली व लोखंडी पाईपने गोपाळ खैरनार यांच्या डोक्याला जबर दुखापत केली. या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात दंगलीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपास प्रभारी पोलीस निरीक्षक प्रकाश वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार नरेंद्र बागुले करित आहे.
