डोंगरकठोरा आदिवासी आश्रम शाळेतील कर्मचार्‍याची आत्महत्या ; सुसाईड नोटमध्ये लिहिली मृत्यूस कारणीभूत असलेल्यांची नावे


Dongarkathora Tribal Ashram School Employee Suicide; The names of the cause of death written in the suicide note यावल : तालुक्यातील डोंगरकठोरा येथील आदिवासी आश्रम शाळेतील शिपायाने राहत्या खोलीत गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना सोमवारी उघडकीस आली. मृत्यूपूर्वी शिपायाने सुसाईड नोट लिहिली असून पोलिसांनी ती ताब्यात घेतली आहे.

गळफास घेत केली आत्महत्या
डोंगरकठोरा येथील आदिवासी आश्रमशाळेत नामदेव दगडू खैरनार (56 , रा. वड्री, ता.यावल) हे सफाई कामगार कामाला होते. सोमवारी त्यांनी आश्रम शाळेतील खोलीत गळफास घेत आत्महत्या केली. तत्पुर्वी त्यांनी आपल्या मुलास व किनगाव येथे सुनेला मोबाईलवर कॉल केला व मला नातु सोबत बोलायचे आहे, असे सांगून नातु सोबत बोलले व नंतर सुनेला सांगितले की, आपल्या घराकडे लक्ष दे माझ्या मरणास जे कारणीभूत आहे त्यांच्या संदर्भात मी माझ्या खिशात चिठ्ठी लिहून ठेवली आहे, असे सांगून त्यांनी कॉल बंद केला.

पोलिसांची घटनास्थळी  धाव
नामदेव खैरनार यांचा मुलगा गोपाळ खैरनार याने घटनास्थळी धाव घेतली असता त्यांना गळफास घेतलेल्या अवस्थेत वडिलांचा मृतदेह आढळला. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे पथकासह दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह यावल ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आला. गोपाळ खैरनार यांच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सुनील मोरे करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !