रावेर तालुक्यात लग्नाच्या दुसर्‍या दिवशी नववधू गायब


Bride goes missing on second day of wedding in Raver Taluka रावेर : तालुक्यातील एका गावात लग्नानंतरच्या दुसर्‍याच दिवशी नववधू सासरहून बेपत्ता झाल्याने रावेर तालुक्यात खळबळ उडाली आहे. सासरकडील मंडळींनी रावेर पोलिसात या प्रकरणी हरवल्याची तक्रार दाखल केली आहे.

नववधूचा आता पोलिसांकडून कसून शोध
यावल तालुक्यातील एका गावातील तरुणीचे रावेर तालुक्यातील नियोजित तरुणाशी लग्न झाले मात्र लग्नाच्या दुसर्‍या दिवशी नववधू घरात नसल्याने सर्वत्र शोधाशोध सुरू झाली मात्र नववधू न आढळल्याने सासरकडील मंडळींनी रावेर पोलिसात धाव हरवल्याची तक्रार दिली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !