पाडळसे गावातील 24 वर्षीय तरुणीवर चाकूहल्ला : तरुण पोलिसांच्या ताब्यात


Knife attack on 24-year-old girl in Padalse village : Youth in police custody यावल : याव तालुक्यातील पाडळसे येथील 23 वर्षीय तरुणीवर गावातीलच एका तरुणाने वैयक्तिक वादातून चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक मंगळवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली. चाकूहल्ल्यानंतर संशयित स्वतःहून फैजपूर पोलिसात हजर झाला आहे. या हल्ल्यात 23 वषर्.ीय तरुणी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जिल्हापेठ पोलिसांनी या तरुणीचा जवाब नोंदवला असून बुधवारी या प्रकरणी गुन्हा दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

कारण नेमके अस्पष्ट
पाडळसे येथील एका भाागात राहणार्‍या 23 वर्षीय तरुणीवर कल्पेश नामक तरुणाने चाकूहल्ला केल्याची माहिती आहे. या हल्ल्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. तरुणीच्या खांद्यावर चाकूला लागल्यानंतर तरुणी रक्तबंबाळ झाल्यानंतर तिला जळगावच्या शासकीय रुग्णालयात उपचारार्थ हलवण्यात आले.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !