मोर धरण परीसरातील विहिरीत आढळला अनोळखी महिलेचा मृतदेह


The body of an unknown woman was found in a well in Mor Dharan area यावल : तालुक्यातील मोर धरण परीसरातील शेत-शिवाराच्या विहिरीत एका अनोळखी महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी केले ओळख पटवण्याचे आवाहन
यावल तालुक्यातील हिंगोणा येथून जवळच असलेल्या मोर धरण रीसरातील शेती शिवारात असलेल्या गट नंबर 1203 या शेत मजूर काम करण्यासाठी गेले असता विहिरीतून दुर्गंधी येत असल्याने डोकावून पाहिले असता मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. ही बाब शेतमजुरांनी तत्काळ शेतमालकाला कळवल्यानंतर शेतमालकाने हिंगोणा गावातील पोलीस पाटील दिनेश बाविस्कर यांना फोनद्वारे माहिती दिली. हिंगोणा पोलीस पाटील दिनेश बाविस्कर तत्काळ घटनास्थळी जाऊन खात्री केल्यानंतर फैजपूर पोलीस ठाण्यात माहिती दिल्यानंतर कर्मचार्‍यांनी धाव घेतली.

जागीच केले शवविच्छेदन
मृतदेह बाहेर काढण्यात आला मात्र तो कुजलेल्या अवस्थेतील असल्याने शवविच्छेदन देखील घटनास्थळीच करण्यात आले. महिलेचे वय अंदाजे 44 वर्ष असून तिच्या हातावरती सखाराम सुभाष असे नाव गोंदलेले आहे. फैजपूर पोलिसांकडून सदर महिलेची ओळख पटविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. फैजपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर आखेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार देविदास सुरदास करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !