भुसावळात लवकरच होणार रोटरीचे डायलिसीस युनिट
रुग्णांना अल्पदरात सेवा : ब्लड बँकेचीही उभारणी : पालिकेच्या जागेत प्रकल्प
A rotary dialysis unit will soon be established in Bhusawal भुसावळ : सामाजिक कार्यासाठी नेहमीच अग्रेसर असलेल्या रोटरी परीवारातर्फे भुसावळ शहरातील जामनेर रोडवरील मुन्सीपल कॉलनीतील पालिकेच्या पाच हजार स्वेअर फूट जागेवर रोटरी सेवा सदनाची उभारणी करण्यात येणार आहे. सदनात डायलीसीस युनिट व ब्लड बँकेची सुरूवात करण्यात येणार असल्याची माहिती रोटरी प्रांतपाल राजीव शर्मा यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना दिली. पालिकेने तीन वर्षांसाठी कराराने ही जागा रोटरी संस्थेला दिली असून त्याबाबतचे पत्र मंगळवारी पदाधिकार्यांना देण्यात आले.
असे आहे प्रकल्पाचे स्वरूप
भुसावळ शहरात डायलीसीस सेंटर सुरू करावे हे डिस्ट्रिक्ट 3030 चे माजी प्रांतपाल राजीव शर्मा आणि रोटरी क्लब ऑफ भुसावळ ताप्ती व्हॅलीचे संस्थापक अध्यक्ष सी.ए.मुकेश अग्रवाल यांचे स्वप्नं होते. रोटरीच्या माध्यमातून प्रकल्प सुरू होण्यासाठी आमदार संजय सावकारे यांनीदेखील पाठपुरावा केला तसेच मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांच्याशी चर्चा केल्यानंतर तीन वर्षांच्या कराराने पालिकेची मोकळा जागा व ईमारत या उपक्रमासाठी वापरण्यास मिळणार आहे. साधारण जुलै महिन्यापर्यंत हा प्रकल्प कार्यान्वीत येण्याची शक्यता राजीव शर्मा यांनी व्यक्त केली.

जागा वापराचे पत्र रोटरीला प्राप्त
मंगळवारी मुख्याधिकारी संदीप चिद्रवार उपविभागीय दंडाधिकारी जितेंद्र पाटील यांच्याहस्ते रोटरी क्लब ऑफ भुसावळ ताप्ती व्हॅलीला डायसिस सेंटर व इतर रोटरी संबंधित सामाजिक सेवा प्रकल्पांसाठी इमारत असलेली खुली जागा सुपूर्द करण्यात आली. त्याबाबतचे पत्र पदाधिकार्यांना छोटेखानी समारंभात सुपूर्द करण्यात आले.
