पैनगंगा नदीवरून पुलावरून बस कोसळली : महिलेचा मृत्यू, 17 जखमी
Bus falls from bridge over Panganga River: Woman killed, 17 injured चिखली : उत्रादपेठ येथील पैनगंगा नदीवरील पुलावरून भरधाव बस नदीपात्रात कोसळून झालेल्या अपघातात एक वृद्ध महिला ठार झाली तर 17 प्रवासी जखमी झाले. बाबा ट्रॅव्हल कंपनीची खाजगी बस बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथून चिखलीमार्गे पुण्याकडे निघाली असता मंगळवारी रात्री हा अपघात घडला.
17 प्रवासी जखमी
जळगाव जामोद येथून पुण्याकडे जाणारी खासगी ट्रॅव्हल बस (यू.पी .78 एफ.एन.4662) मंगळवारी रात्री 11.30 वाजताच्या सुमारास पैनगंगा नदीच्या पुलावरून कोसळली मात्र नदीला पाणी नसल्याने व पुलाची उंची कमी असल्याने पुलावरून कलंडलेल्या बसमधील प्रवाशांना गंभीर इजा झाली नाही. अपघातात 17 प्रवासी जखमी झाले असून या अपघातात वयोवृद्धा संगीता ठाकरे या मयत झाल्या आहेत.





ग्रामस्थांसह पोलिसांची धाव
अमडापूर व चिखली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. गावकर्यांनीही तातडीने धाव घेत जखमींना जवळच्या रुग्णालयात पोहोचविण्यासाठी मदत केली. रात्रीचा गडद अंधार असल्याने मदत कार्यास अडथळा निर्माण झाला.
