भुसावळातील सिनीयर डीसीएम डॉ.शिवराज मानसपुरेंची मुंबईत पीआरओपदी बदली


Senior DCM of Bhusawal Dr. Shivraj Manaspure transferred to Mumbai भुसावळ : भुसावळ डीआरएम कार्यालयातील वरीष्ठ वाणिज्य प्रबंधक डॉ.शिवराज मानसपुरे यांची अचानक मुंबई येथे मध्य रेल्वेचे मुख्य पीआरओ म्हणून बदली झाली असून अद्याप त्यांच्या जागी कुणाचीही नियुक्ती करण्यात आलेली नाही. अत्यंत शिस्तप्रिय व प्रामाणिक अधिकारी म्हणून डॉ.मानसपूरे यांची ख्याती असल्याने त्यांचा खात्यात मोठा दबदबा होता.

नवीन अधिकार्‍यांच्या नियुक्तीकडे लागले लक्ष
डॉ.मानसपुरे यांनी मार्च 2022 मध्ये भुसावळ विभागाचा पदभार घेतल्यानंतर अत्यंत प्रामाणिक व शिस्तप्रिय अधिकारी म्हणून त्यांचा दबदबा राहिला. डॉ.मानसपुरे यांनी विभागात फुकट्या प्रवाशांविरूध्द अनेकवेळा विशेष मोहिम राबवून मोठ्या प्रमाणावर दंड वसूल करीत रेल्वेच्या उत्पन्नात भर टाकली आहे. नवीन अधिकारी कोण येतात ? याकडे लक्ष लागले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !