रावेर तालुक्यातील अल्पवयीन तरुणी अत्याचारातून गर्भवती
Minor girl from Raver taluka pregnant due to abuse रावेर : ऊस तोडणी करणार्या कामगार कुटूंबातील अल्पवयीन मुलीवर परीचितातील तरुणाने वारंवार अत्याचार केल्याने त्यातून पीडीता गर्भवती राहिल्याची धक्कादायक बाब रावेर तालुक्यात उघडकीस आली आहे. या प्रकरणी संशयित रीयाज अजित तडवी (रावेर तालुका) याच्याविरोधात पोस्कोसह अन्य कलमान्वये रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
झोपडीत केला अत्याचार
45 वर्षीय विवाहितेच्या तक्रारीनुसार त्यांच्यासह पती ऊस तोडणीचे काम करतात व ऊस तोडणीनिमित्त हे कुटूंब भवानी नगर साखर कारखान्याच्या परीसरात गेल्यानंतर झोपडीत राहत असललेया अल्पवयीन मुलीवर रीयाज अजित तडवी (रावेर तालुका) याने बालिकेच्या अजाणतेपणाचा फायदा घेत तिच्यावर अत्याचार केला. फलटण व बारामती जवळील परीसरातही हा प्रकार कायम सुरू होता. 14 जून 2022 ते 25 ऑगस्ट 2022 दरम्यान तरुणाने वारंवार पीडीतेवर अत्याचार केल्याने त्यातून पीडीता गर्भवती राहिल्याची बाब उघडकीस आली. या प्रकरणी पीडीतेच्या आईने मंगळवारी रावेर पोलिसात तक्रार दिल्यावरून तरुणाविरोधात रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक विशाल सोनवणे करीत आहे.
