दोन कोटींची अनामत जप्त : भुसावळातील ठेकेदार विनय बढेंना खंडपीठात दिलासा
Deposit of two crores confiscated : Bhusawal contractor Vinay Bhede gets relief in the bench भुसावळ : रस्त्यांची कामे मुदतवाढ देवूनही न केल्याने शहरातील ठेकेदार बढे यांची अनामत व बिलासह दोन कोटी 16 लाख 83 हजार 788 रुपयांची रक्कम पालिकेने जमा केली होती. न झालेल्या कामांसाठी निविदा काढण्याची प्रक्रिया पालिकेने राबवल्यानंतर ठेकेदार मे. विनय सोनू बढे कंपनीतर्फे खंडपीठात रीट दाखल करण्यात आली. खंडपीठाने पालिकेने निविदा प्रक्रिया राबविण्यात येवू नये, असे निर्देश दिल्याने ठेकेदाराला मोठा दिलासा मिळाला आहे.
ठेकेदार व पालिका वादात कामे रखडली
विशेष रस्ता अनुदान योजनेंतर्गत सुमारे 12 कोटी रुपयांचे रस्त्यांचे कामे ठेकेदार बढे यांना मिळाली मात्र मुदत संपूनही व नंतर 778 दिवस मुदतवाढ देवूनही ठेकेदाराने काम पूर्ण न केल्याने ठेकेदाराचेी दोन कोटी 16 लाख 83 हजार 788 रुपये रक्कम जप्त करण्यात आली तसेच ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याचा प्रस्ताव सा.बां.विभागाला देण्यात आला. जप्त केलेली रक्कम व अखर्चीत निधी अशी सुमारे चार कोटी रुपयांच्या निधीतून नवीन निविदा काढण्याचे नियोजन केले मात्र त्यास खंडपीठाने स्थगिती दिली आहे.
