भुसावळात दुकान बंद करताना व्यापार्‍याला गावठी कट्टा लावून लुटले

बुधवारी रात्री आठवडे बाजारातील धक्कादायक घटना : व्यापार्‍यांमध्ये पसरली भीती


While closing the shop in Bhusawal, the trader was robbed by the villagers भुसावळ : दुकान बंद करीत असताना पाळत ठेवून असलेल्या दोघा गुन्हेगारांनी व्यापार्‍याला गावठी कट्ट्याचा धाक दाखवून लुटल्याची धक्कादायक घटना बुधवारी रात्री 10.30 वाजेच्या सुमारास आठवडे बाजारात घडली. यावेळी व्यापार्‍याच्या हातातील रोकड न मिळाल्याने आरोपींनी व्यापार्‍याच्या गळ्यातील चैन ओरबाडली मात्र त्यातील अर्धा भागच आरोपींच्या हाती लागल्याने तोच घेवून त्यांनी दुचाकीवरून पळ काढला. या घटनेने शहरातील व्यापार्‍यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

व्यापारीवर्गात उडाली खळबळ
भुसावळातील आठवडे बाजारात मोहनलाल चावरीया यांचे गणेश ट्रेडर्स नामक दुकान असून ते होलसेल किराणा मालाचे पुरवठादार आहे. नेहमीप्रमाणे बुधवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास त्यांनी दुकान बंद करून दुकानाला नमस्कार करीत असताना तोंडाला मास्क लावून आलेल्या 25 ते 30 वयोगटातील तरुणांनी व्यापार्‍याला गावठी कट्टा व चाकूचा धाक दाखवत धमकावले व त्याच्याकडील बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला मात्र बॅग हाती न आल्याने व्यापार्‍याच्या गळ्यातील सोन्याची चॅन हिसकावण्यात आली मात्र त्यातही चैनचा अर्धाच भाग हाती आल्यानंतर आरोपींनी दुचाकीवरून पलायन केले. या प्रकारानंतर काही वेळ व्यापारी भांबावून गेला तर मार्केटमध्ये घटना कळताच व्यापारीदेखील घाबरले.

पोलीस यंत्रणेची धाव
पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, बाजारपेठचे प्रभारी निरीक्षक गजानन पडघण व बाजारपेठ पोलीस स्टेशनचे कर्मचार्‍यांनी धाव घेत घडलेला प्रकार जाणून घेतला तसेच व्यापार्‍याने सांगितलेल्या वर्णनावरून संशयितांचा शोध सुरू केला आहे मात्र रात्रीच्या वेळी सर्व व्यापारी घरी निघून गेल्याने सीसीटीव्हीतून आरोपी निष्पन्न करणे अशक्य ठरल्याने गुरुवारी पुन्हा शोध मोहिम राबवली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !