भुसावळात निदर्यतेने वाहतूक होताना शहरवासीयांची सतर्कता : 17 म्हशींची सुटका

मध्यप्रदेशातील ट्रक चालकासह तिघांविरोधात गुन्हा : शहर पोलिसांची कारवाई


Vigilance of the city dwellers during the sleepless traffic in Bhusawal : Rescue of 17 buffaloes भुसावळ :शहरातील जॉली पेट्रोल पंपासमोर सुज्ञ नागरीकांनी कत्तलीच्या उद्देशाने ट्रकमधून गुरांची वाहतूक होत असल्याच्या संशयातून ट्रक अडवला मात्र या ट्रकमधील म्हशींची निदर्यतेने वाहतूक होत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर मंगळवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास यंत्रणेने ट्रक शहर पोलीस ठाण्यात आणत तिघा आरोपींना अटक केली तसेच ट्रकमधील 17 म्हशींची जामनेरच्या कृष्णप्रसाद गो शाळेत रवानगी केली. या प्रकरणी मध्यप्रदेशातील ट्रक चालकासह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, शहरातून मोठ्या प्रमाणावर अवैधरीत्या गुरांची वाहतूक होत असतानाही अपवादात्मक कारवाई होत असल्याने यंत्रणेच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

भुसावळवासीयांची सतर्कता
शहरात यापूर्वीही मध्यरात्रीच्या सुमारास गुरांची अवैधरीत्या कत्तलीच्या उद्देशाने वाहतूक होत असल्याने नागरीकांनी स्वतःच रस्त्यावर उतरून ट्रक पकडल्याचे प्रकार घडले असतानाच मंगळवारी पहाटे असाच एक ट्रक जात असल्याचे नागरीकांच्या लक्षात आल्यानंतर जॉली पेट्रोल पंपाजवळ ट्रक (एम.एच.18 बी.जी.1665) येताच तो नागरीकांनी अडवला मात्र या ट्रकमध्ये दाटीवाटीने म्हशींची वाहतूक होत असल्याचे लक्षात आल्यानंतर भुसावळ शहर पोलिसांना माहिती कळवण्यात आली. शहर पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक अंबादास पाथरवट, सहाय्यक फौजदार ईकबाल सैय्यद, हवालदार सुपडा पाटील, हवालदार शशिकांत पाटील आदींनी धाव घेत चौकशी केली असता ट्रक चालकाकडे म्हशींच्या वाहतुकीचा कुठलाही परवाना आढळून आला नाही शिवाय म्हशींची अत्यंत निर्दयतेने व दाटीवाटीने वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आल्याने पोलिसांनी ट्रक ताब्यात घेत 17 म्हशींची जामनेरच्या गो शाळेत रवानगी केली. खरगोन येथून या म्हशी औरंगाबाद येथे नेल्या जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.

ट्रक चालकासह तिघांविरोधात गुन्हा
शहर पोलिसात या प्रकरणी हवालदार सुपडा श्रीराम पाटील यांच्या फिर्यादीनुसार ट्रक चालक सलमान खान जाकीर खान (28), क्लिनर फारूख फकरू खान (28, दोन्ही रा.बलखड, ता.कसरावड, जि.खरगोन, मध्यप्रदेश) व मजूर सोहेल खान मीनत खान (जोमकार, ता.जि.शजापूर) यांच्याविरोधात प्राण्यांचा छळ प्रतिबंधात्मक कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर ट्रक चालकासह तिघांना अटक करण्यात आली. तपास सहाय्यक फौजदार ईकबाल सैय्यद करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !