नायगावात शेत विहिरीत आढळला 40 वर्षीय इसमाचा मृतदेह


The dead body of 40-year-old Isma was found in a field well in Naigaon यावल : तालुक्यातील नायगाव या गावात चुंचाळे रस्त्यावर असलेल्या शेत विहिरीत मंगळवारी रात्री 40 वर्षीय इसमाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. मयत हा मूळचा वाघझिरा येथील रहिवाशी असून तो हल्ली नायगाव गावात वास्तव्यास होता. रात्रीच मृतदेह विहिरीतून काढत यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला.

आत्महत्या की अपघात ? कारण अस्पष्ट
नायगाव, ता.यावल या गावातून चुंचाळेकडे जाणार्‍या रस्त्यावर प्रमोद जिजाबराव पाटील यांचे शेत आहे. या शेतातील विहिरीतून मंगळवारी सांयकाळी दुर्गंधी येत असल्याने विहिरीत डोकावून पाहिले असता तेथे मृतदेह दिसून आला. ग्रामस्थांच्या मदतीने रात्री मृतदेह बाहेर काढण्यात आला. मयत इसम हा मूळचा वाघझिरा येथील रहिवाशी तथा हल्ली नायगाव गावातील राहत असलेला रफिक हुसेन तडवी (40) याचा असल्याचे स्पष्ट झाले आहे. मयताच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परीवार आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !