फेकरीतील सी कॅबीनवर अनोळखी जमावाचा हल्ला : रेल्वे कर्मचारी हादरले


Unidentified mob attack on C cabin in Fekr i: Railway staff shaken भुसावळ : तालुक्यातील फेकरी गावाजवळील रेल्वेच्या सी कॅबीनवर 15 ते 20 जणांच्या जमावाने अचानक हल्ला केल्याची घटना मंगळवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेत सुदैवाने कुणीही जखमी झाले नसलेतरी रेल्वे कर्मचार्‍याला धमकावल्याप्रकरणी 15 ते 20 जणांच्या जमावाविरोधात भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेने तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली मात्र संशयित आढळून आले नाहीत.

आरपीएफ कुठे असल्याची विचारणा करीत हल्ला
मंगळवारी रात्री 9.30 वाजेच्या सुमारास फेकरी जवळील सी कॅबीनवर सुमारे 20 संशयितांनी अचानक सी कॅबीनवर हल्लाबोल करीत आरपीएफ कुठे आहेत? याची विचारणा केली. जमावाकडे लाठ्या-काठ्या असल्याने कॅबीनमधील कर्मचार्‍यांनी जीव वाचविण्यासाठी कॅबीनला आतून कडी लावून घेतली तर जमावाने दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला मात्र दरवाजा तुटला नाही. हा प्रकार रात्री 12 वाजेपर्यत सुरू होता. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात सितेश कुमार वैद्यनाथ प्रसाद ठाकूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अनोळखी 20 जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

संशयित कोळसा चोरी करणारे असल्याची शक्यता
दरम्यान, संशयित कोळसा चोरी करणारे असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तालुका पोलिसांनी आता गोपनीय माहितीद्वारे संशयितांचा शोध सुरू केला आहे. रेल्वे सुरक्षा बलाचे वरीष्ठ आयुक्त श्रीनिवास राव यांनीही या घटनेची माहिती जाणून घेतली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !