ब्राह्मण संघाच्या विशेष सर्वसाधारण सभेत कार्यकारणी जाहीर


अध्यक्षपदी विजय जोशी तर सचिवपदी प्र.ह.दलाल

भुसावळ : ब्राह्मण संघाची विशेष सर्वसाधरण सभा रविवार, 12 रोजी झाली. सर्वसाधारण सभेने नेमलेल्या त्रीसदस्यीय समितीने नुतन कार्यकारणीची निवड केली. यात अध्यक्षपदी विजय पद्माकर जोशी तर सचिवपदी प्र.ह.दलाल यांची निवड करण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी रघुनाथ मांडाळकर होते. सुरुवातीला मागील सभेचे इतिवृत्त मावळते प्रभारी सचिव विजय जोशी यांनी केले. दीपप्रज्वलन सुरेशराव कुलकर्णी, अ‍ॅड.संजय जोशी व विभास मुळे, मावळते अध्यक्ष रघुनाथ मांडाळकर यांनी केले. त्रीस्तरीय समितीने जाहीर केलेल्या नुतन कार्यकारणीत उपाध्यक्ष सुनील पाठक, सहसचिव आमोद टेंभुर्णीकर, कोषाध्यक्ष प्रसन्न गंधे, अंतर्गत हिशोब तपासणीस शंतनु रामचंद्र गचके. कार्यकारणी सदस्य गजानन जोशी, सुनील जोशी, देवेंद्र जोशी, संजय बोचरे, अभिराम मेहंदळे, हेमंत भोकरडोळे, सुधीर देशपांडे, अनिरुद्ध कुळकर्णी, रवींद्र फडके, रघुनाथ मांडाळकर, विजय घौसास, भालचंद्र जोशी. महिला प्रतिनिधी ऍड. चित्रा प्रसाद आचार्य, सरीता सुधीर कुलकर्णी, गीता अनंत नागराज यांचा समावेश आहे. विशेष सभेची सांगता पसायदानाने करण्यात आली. नवनियुक्त कार्यकारणीचे पदाधिकारी, सभासद, मान्यवरांसह सर्वच स्तरातून स्वागत होत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !