भुसावळ विभागातील पाच तिकीट निरीक्षकांचा महाव्यवस्थापकांच्या हस्ते मुंबईत सत्कार


भुसावळ : रेल्वे प्रवासात तिकीटाविनाच प्रवास करणार्‍यांविरोधात धडक मोहिम राबवून कारवाई करीत रेल्वेला कोट्यवधींचा महसूल मिळवून देणार्‍या भुसावळ विभागातील पाच तिकीट निरीक्षकांचा मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक नरेश ललवाणी यांच्याहस्ते मंगळवारी मुंबईत सत्कार करण्यात आला.

महसूल देणार्‍या कर्मचार्‍यांचा गौरव
के.के.पाटील, गुडू कुमार गुप्ता, विनय ओझा, आर.के.गुप्ता व वंदना ढोमने असे या पाच तिकीट निरीक्षकांची नावे आहेत. भुसावळ रेल्वे विभागाचे सिनिअर डीसीएम डॉ. शिवराज मानसपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली गत वर्षभरात वेळोवेळी विनातिकीट प्रवाशांविरोधात कारवाई करण्यात आली. त्यात पाचही तिकीट निरीक्षकांनी मोठ्या प्रमाणावर रेल्वेला महसूल मिळवून देत दंडात्मक कारवाई केल्याने भुसावळ विभागातील या पाचही कर्मचार्‍यांना मुंबई येथे बोलावून महाव्यवस्थापकांच्या हस्ते गौरवण्यात आले. यावेळी भुसावळ विभागाचे मुख्य वाणिज्य निरीक्षक तरुण बिरिया यांचाही सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाता ऑनलाईन पद्धतीने भुसावळचे डीआरएम एस.एस.केडिया व सिनिअर डीसीएम डॉ.शिवराज मानसपुरे सहभागी झाले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !