खामखेडा पुलावरून उडी घेत तरुणाची आत्महत्या
Youth committed suicide by jumping from Khamkheda bridge कुर्हाकाकोडा : तालुक्यातील खामखेडा पुलावरून उडी घेत तरुणाने आत्महत्या केली. किशोर सुरेश बडे (38, सालबर्डी, ता.मुक्ताईनगर) असे मयत तरुणाचे नाव आहे.
आत्महत्येचे कारण अस्पष्ट
आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. किशोर बडे या तरुणाने दिनांक मंगळवारी दुपारी 3.30 वाजेच्या सुमारास पुलावरून उडी घेऊन जीवनयात्रा संपवली. बुधवारी किशोरचा मृतदेह पूर्णा नदीच्या काठावर आढळला. मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आला असून मुक्ताईनगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
