भुसावळातील रामदासवाडीत धाडसी घरफोडी : दिड लाखांचा ऐवज लंपास


Daring house burglary at Ramdaswadi in Bhusawal: 1.5 lakhs lost instead भुसावळ : वैद्यकीय कामानिमित्त कुटूंब नाशिक येथे उपचारासाठी गेल्यानंतर घर बंद असल्याची संधी चोरट्यांनी साधत शहरातील रामदासवाडी भागातील बंद घरातून एक लाख 31 हजारांचा ऐवज लांबवला. ही घटना 29 एप्रिल ते 10 मे दरम्यान घडली. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

बंद घरे चोरट्यांना पर्वणी
दत्तात्रय देविदास नेमाडे (65, खडका रोड, रामदासवाडी, भुसावळ) हे कुटूंबासह रामदासवाडी भागात वास्तव्याला आहेत. दवाखान्याच्या कामानिमित्त नेमाडे यांच्यासह कुटूंबातील सदस्य नाशिक येथे लहान मुलगी रुपाली हिच्याकडे 29 एप्रिल रोजी गेल्याने घराला कुलूप होते. ही संधी चोरट्यांनी साधत 29 एप्रिल ते 10 मे दरम्यान घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून कपाटातील 35 ग्रॅम वजनाचे व 70 हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र, 10 ग्रॅम वजनाची व 20 हजार रुपये किंमतीची सोन्याची पोत, 20 हजार रुपये किंमतीच्या सोन्याच्या अंगठ्या, सहा हजार रुपये किंमतीचे कानातले तसेच 15 हजारांची रोकड असा एकूण एक लाख 31 हजारांचा ऐवज लांबवला.

अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा
नेमाडे हे गावावरून आल्यानंतर घरफोडीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर त्यांनी बाजारपेठ पोलिसात धाव घेत तक्रार दिल्यावरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, बाजारपेठ निरीक्षक राहुल गायकवाड व बाजारपेठ पोलिसांनी धाव घेत पाहणी केली. तपास हाय्यक निरीक्षक हरीष भोये करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !