विजेचा धक्का लागल्याने कोळवदमधील अल्पवयीन मुलीचा दुदैवी मृत्यू


Unfortunate death of minor girl in Kolwad due to electric shock यावल : यावल तालुक्यातील कोळवद गावातील एका आदिवासी कुटुंबातील चिमकुलीस विजेचा धक्का लागल्याने तिचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी सकाळी घडली. मुस्कान संजय तडवी (14) असे मयताचे नाव आहे. कोळवद येथील संजय बिस्मिल्ला तडवी यांची मुस्कान ही अल्पवयीन मुलगी शुक्रवारी सकाळी साडेआठ ते नऊ वाजेच्या दरम्यान आपल्या घरातील पाणी भरण्यासाठी इलेक्ट्रीक मोटर लावत असताना तिला विजेचा शॉक लागला व त्यात तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.

कोळवद गावात हळहळ
मुस्कान ही सातोदच्या विकास विद्यालयात आठवीचे शिक्षण घेत होती. विजेचा धक्का लागल्यानंतर तिच्या कुटुंबाने गावातील मंडळीच्या मदतीने तत्काळ तिला यावल येथे खाजगी रुग्णालयात उपचारासाठी आणाले असता तिला वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. मुलीच्या मृत्यूने गावात सर्वत हळहळ व्यक्त करण्यात आली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !