पैशांच्या वादातून मित्राच्या वडिलांची हत्या : आरोपीला अटक


Chhatrapati Sambhajinagar shaken : Adult killed on Bhar road छत्रपती संभाजीनगर : पैशांच्या वादातून मित्रांच्या वडिलांची चाकूने हत्या करण्यात आली. ही घटना टाऊन हॉल परीसरात शुक्रवारी रात्री घडली. भर रस्त्त्यावरच झालेल्या खुनानंतर शहरात मोठी खळबळ उडाली. या घटनेत कैलास रामचंद्र वाकेकर (47, रा. जयभीमनगर, टाऊन हॉल) यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी अजय काशीनाथ चव्हाण (25, रा. पेठेनगर, भावसिंगपुरा) यास अटक करण्यात आली.

पैशांचा वाद बेतला जीवावर
मृत कैलास यांच्या दोन्ही मुलांसोबत संशयित आरोपी अजय चव्हाण याची मैत्री होती. काही वर्षीपूर्वी अजय चव्हाण हा सुद्धा जयभीमनगरमध्ये राहत होता. त्यातुन त्याची ओळख होती. कैलास वाकेकर हे रंग देण्यास इतर प्रकारचे काम करून उदारनिर्वाह करीत होते. अजय चव्हाण हा सुद्धा रोजंदारीवर काम करीत होता. शुक्रवारी कैलास वाकेकर यांच्यासोबत पैशाच्या व्यवहारातुन दोघात वाद झाले व अजयने त्यांच्यावर चाकूने हल्ला केला. त्यात कैलास रस्त्यावरच कोसळले. घटनास्थळावर आरोपी अजय यासही बेदम मारहाण करण्यात आली. गंभीर जखमी कैलास यांना घाटी रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याठिकाणी मृत घोषीत करण्यात आले.






पोलीस अधिकार्‍यांची धाव
बेगमपुराचे निरीक्षक शिवाजी तावरे, सहाय्यक निरीक्षक हरेश्वर घुगे, उपनिरीक्षक विशाल बोडखे यांच्यासह इतरांनी धाव घेत पंचानामा केला.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !