मुक्ताईनगरात 20 वर्षीय विवाहितेवर अत्याचार : तरुणाला अटक
20-year-old married man assaulted in Muktainagar : Youth arrested मुक्ताईनगर : शहरातील एका भागातील 20 वर्षीय विवाहितेवर 18 वर्षीय तरुणाने अत्याचार केल्याची संतापजनक घटना एका भागात मंगळवार, 9 रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास घडली. या घटनेप्रकरणी संशयित सागर सुरेश शिंदे (18, मुक्ताईनगर) याच्याविरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.
शौचाला जात असलेल्या विवाहितेवर अत्याचार
शहरातील एका भागातील 20 वर्षीय विवाहिता शौचास जात असताना आरोपीने विवाहितेचा रस्ता अडवत तिला एका झोपडीत नेत तिच्यावर अत्याचार केला. ही घटना मंगळवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास घडली. ही बाब पीडीतेने कुटूंबाला सांगितल्यानंतर शुक्रवारी रात्री संशयित आरोपी सागर शिंदे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला व आरोपीला अटक करण्यात आली. उपविभागीय अधिकारी डॉ.कुणाल सोनवणे यांनी भेट देत गुन्ह्याची माहिती जाणून घेतली. तपास सहा.निरीक्षक संदीप दुनगहू करीत आहेत.
