शुभमंगल सावधान ! रावेरात दुसर्‍या तरुणीशी घरोबा करण्यापूर्वीच पहिली पत्नी धडकली


Exposed while leaving the first one and marrying the second one : Raver  broke the planned marriage रावेर : लिव्ह ईन रीलेशीपमध्ये राहिल्यानंतर तो तिच्याशी विवाहबद्ध झाला मात्र घरच्यांपुढे ही बाब लपवून ठेवत त्याने दुसर्‍या तरुणीशी विवाहाची तयारी दर्शवल्याने लग्नाची तयारी सुरू झाली… प्रत्यक्षात लग्नाचा दिवसही उजाडला मात्र तरुणीच्या गळ्यात माळा टाकणार तो पहिली पत्नी प्रकटली अन नियोजित वराचा भंडाफोड झाल्याने विवाह रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. रावेरातील महाराजा मंगल कार्यालयात ही घटना घडली.

तरुणाच्या मनसुब्यावर फेरले पाणी
लालबाग येथील तरुणाचा विवाह रमजीपूर (ता.रावेर) येथील युवतीशी शुक्रवार, 12 रोजी दुपारी होणार होता. नवरदेव बॅण्डवाजा घेवून मंगल कार्यालयात पोहोचला खरा मात्र अक्षता पडण्याआधीच पहिली पत्नी प्रकटली व तिचे आमचे लग्न झाल्याचा दावा केल्याने मंडपात गोंधळ उडाला. या घटनेत वेळीच पोलीस पोहोचल्याने अनर्थ टळला व दुसर्‍या लग्नाची स्वप्ने पाहणार्‍या तरुणाचा हिरमोड झाला.

तरुणाने दिली अखेर कबुली
लालबाग येथील वैभव महाजन बी.ई.शिक्षित असून त्याचे दुसर्‍या समाजातील मुली सोबत अफेयर झाल्यानंतर दोघे लव्ह अ‍ॅण्ड रीलेशनशीपमध्ये राहिले व त्यांनी 10 एप्रिल रोजी पुण्यात देहू येथील अलंकापुरी येथे लग्न लावुन घेतले. त्या तरुणीला घरी ठेवुन दुसर लग्न करण्यासाठी निघालेल्या या नवरदेवाला अक्षता पडण्याआधी पहिल्या पत्नीने रोखत झाल्या प्रकाराचा भंडाफोड केला. वाद होण्याआधीच पोलीस या ठिकाणी पोहेचल्याने नवरदेव व त्याची पुण्याहून आलेली पत्नी यांना पोलीस ठाण्यात आणून चौकशी केल्यावर नवरदेव वैभव याने लग्न केले असल्याचे कबुल केले.

आईला त्रास न होण्यासाठी लपवली बाब
यावेळी समाजातील मंडळीने हस्तक्षेप करून नियोजीत विवाह रोखण्याचा निर्णय घेतला. वैभव आपल्या घरी लालबाग आला असता आईची तब्ब्येत खराब असल्याने तिला मानसिक त्रास होईल, या विवाहाबद्दल घरात कुणालाही काही एक न सांगता समाजातील मुलीशी विवाह करण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती त्याने पोलिसांना दिली आहे. पहिल्या पत्नीला दुसरे लग्न न करण्याचे त्याने वचन दिले मात्र दोन दिवसांपासून त्याने मोबाईल बंद करीत बोहल्यावर चढण्याची तयारी केल्याची कुणकुण पुण्यातील पहिल्या पत्नीला लागल्याने तिने रावेर गाठले. अक्षता पडण्याच्या काही क्षण आधी तिने गौप्यस्फोट केल्याने लग्न मंडपात प्रचंड गोंधळ उडाला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !