अंजाळेतील शेतकर्‍याचा शेतातील तुटलेल्या वीज तारेच्या धक्क्याने मृत्यू


 farmer in Anjale died due to shock from a broken power line in the field यावल : यावल तालुक्यातील अंजाळे गावाच्या शिवारात शेतात पिकांना पाणी देण्यासाठी गेलेल्या शेतकर्‍याचा तुटलेल्या विद्युत तारेचा शॉक लागल्याने मृत्यू झाला. या प्रकरणी यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. वासुदेव मार्तंड चौधरी (57) असे मयत शेतकर्‍याचे नाव आहे.

तुटलेल्या तारेचा स्पर्शाने मृत्यू
वासुदेव चौधी हे शुक्रवारी सकाळी आपल्या गाव शिवारातील असलेल्या त्यांच्या शेत गट क्रमांक- 552 मध्ये केळीच्या बागेत पाणी देण्यासाठी मोटर सुरू करण्यासाठी गेल्यानंतर इलेक्ट्रिक खांबावरील तुटलेल्या तारेला त्यांचा धक्का लागताच त्यांना जबर शॉक बसला व त्यांचा मृत्यू ओढवला.

यावल पोलिसात नोंद
वासुदेव चौधरी यांच्या पत्नी त्यांना वारंवार कॉल करीत असताना प्रतिसाद न मिळाल्याने त्यांच्या नातेवाईकांनी व गावातील ग्रामस्थांनी शेतात पाहणी केली असता हा प्रकार उघडकीस आला. ही घटना अंजाळे गावात माहिती पडताच परीसरात ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेची खबर त्यांचा पुतण्या सचिन पुंडलिक चौधरी यांनी यावल पोलीस ठाण्यात दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास यावल पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक किशोर परदेशी करीत आहे. मयत वासुदेव चौधरी यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ, सून, पुतणे व नातेवाईक असा परीवार आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !