भुसावळात लग्न कार्यक्रमात नाचताना धक्का लागल्याच्या वादातून एकावर चाकूहल्ला : दोघांविरोधात गुन्हा
In Bhusawal, one was stabbed in a dispute over being shocked while dancing at a wedding ceremony : a crime against both भुसावळ : लग्नाच्या कार्यक्रमानिमित्त नाचत असताना धक्का लागल्याने जाब विचारल्याच्या रागातून एकावर चाकूने हल्ला करण्यात आला. ही घटना शहरातील दिनदयाल नगरात गुरुवारी रात्री 11 वाजता घडली.
दोघांविरोधात गुन्हा दाखल
अजय ठाकूर यांच्या घरासमोर अंगणात संतोष गणेश राऊत हे नाचत असतांना त्यांना धक्का लागल्यानंतर त्यांनी जाब विचारल्याने याचा राग आल्याने संशयित समीर शहा उर्फ हमरू जब्बार याने मारहाण करीत चाकूने पोटावर वार केले. राऊत यांनी या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात फिर्याद दिल्यानंतर समीर शहा व त्याच्या सोबतच्या एका जणाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार जितेंद्र पाटील करीत आहेत.
