मुक्ताईनगरात भरधाव ट्रक ट्रॅक्टरला धडकला : दुधलगावातील एकाचा मृत्यू


A speeding truck collides with a tractor in Muktainagar : One person dies in Dudhalgaon मुक्ताईनगर : भरधाव ट्रकने ट्रॅक्टरला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुधलगावच्या एकाचा मृत्यू झाला. हा अपघात तालुक्यातील पिंप्री अकराऊत गावाजवळ शुक्रवार, 12 मे रोजी सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास घडला.संतोष अशोक खाचणे (46, दुधलगाव, ता.मलकापूर) असे मयताचे नाव आहे.

ट्रक चालकाविरोधात गुन्हा
भरधाव ट्रक (क्रमांक एम.एच.40 वाय.8953) वरील चालकाने भरधाव वेगात वाहन चालवत ट्रॅक्टर (क्रमांक एम.एच.28 ए.जे.2848) ला मागून धडक दिल्याने मलकापूर तालुक्यातील दूधलगाव येथील संतोष अशोक खाचणे यांचा मृत्यू झाला तर अरुण हरीभाऊ झोपे (दुधलगाव) हे गंभीर जखमी झाले. अपघातानंतर ट्रकवरील वाहनचालक फपसार झाला. मयताचे भाऊ सुनील अशोक खाचणे (48, दुधलगाव, खुर्द, ता.मलकापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ट्रकवरील अज्ञात वाहन चालकाविरुद्ध मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहा.निरीक्षक संदीप दुनगहू यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल मोहम्मद तडवी करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !