रावेरात टेपरेकॉर्डर बसवण्याच्या वादातून तरुणाला मारहाण ; तिघांविरोधात गुन्हा दाखल
A young man was beaten up over a dispute over installation of a tape recorder in Ravera; A case has been registered against three
रावेर : वाहनात इलेक्ट्रीक टेपरेकॉर्डर बसवण्याच्या वादातून एकाला मारहाण करण्यात आल्याची घटना छोरीया मार्केटमधील बजाज रेडिओज अॅण्ड इलेक्ट्रॉनिक्सजवळ शुक्रवारी सायंकाळी साडेसात वाजता घडली. या प्रकरणी तिघांविरोधात रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
तिघांविरोधात गुन्हा दाखल
शेख सद्दाम शेख कलाम (28, रसलपूर) या तरुणाच्या तक्रारीवरून शेख समद शेख नूर मोहम्मद, शेख शब्बीर शेख समद, शेख अहेफाज शेख नबी (रसलपूर, ता.रावेर) यांच्याविरोधात रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार सतीश सानप करीत आहेत.
