वाघूर नदीच्या पात्रात अनोळखीचा मृतदेह आढळला
The body of an unknown person was found in the bed of Waghur river भुसावळ : तालुक्यातील सुनसगाव येथील के.टी.वेअर बंधार्यात 35 वर्षीय तरुणाचा मृतदेह तरंगताना रविवार, 14 रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास आढळल्याने खळबळ उडाली आहे. मासेमारी करणार्याने याबाबतची माहिती माजी पोलीस पाटील प्रकाश मालचे व पत्रकार जितेंद्र काटे यांना कळवल्यानंतर नशिराबाद पोलिसांना माहिती कळवण्यात आली.
नशिराबाद पोलिसांची धाव
पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र साळुंखे व हवालदार शिवदास चौधरी, गणेश गायकवाड यांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी सामान्य रुग्णालयात हलवला. मयताच्या अंगात लाल रंगाचा बनियन व लाल रंगाची अंडरपॅन्ट आहे तसेच गळ्यात धागा आहे. ही घटना ही तीन चार दिवसांपूर्वी घडल्याचा अंदाज आहे. याबाबत नशिराबाद पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र साळुंखे करीत आहेत.
