फैजपूरातील आंदोलकांविरोधात अखेर गुन्हा दाखल
A case has finally been registered against the protesters in Faizpur फैजपूर : शहरातील सुभाष चौकातील श्रीराम चित्रपटगृहात द केरळाला स्टोरी चित्रपटाचे प्रदर्शन सुरू असताना अज्ञात समाजकंटकांनी चित्रपटगृहावर दगडफेक केली होती. ही घटना शुक्रवार, 12 रोजी दुपारी दिड वाजेच्या सुमारास घडल्यानंतर जमावाने रस्त्यावर उतरून रस्ता रोको आंदोलन केले होते. जमावबंदीचे आदेश असतानाही आंदोलन करण्यात आल्याने 30 ते 35 जणांच्या जमाविरोधात फैजपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल
जमावबंदी आदेशाचे उल्लंघण करून आंदोलन केल्याप्रकरणी 30 ते 35 जणांच्या जमावाविरोधात फैजपूरचे पोलीस शिपाई राहुल रत्नाकर चौधरी यांनी फिर्याद दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार रवींद्र मोरे करीत आहेत.
