पाईप लाईन जोडणीच्या रागातून चारठाण्यात पिता-पूत्राला मारहाण
Father and son beaten up in Charthana out of anger over pipe line connection मुक्ताईनगर : विहिरीची पाईप लाईन फुटल्यानंतर ती जोडणी केल्याच्या रागातून तालुक्यातील चारठाणा येथे पिता-पूत्रांना मारहाण करण्यात आली. या प्रकरणी चौघांविरोधात मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
चौघांविरोधात पोलिसात गुन्हा दाखल
वैभव किशोर भोळे (29, चारठाणा) यांच्या तक्रारीनुसार, 13 रोजी सकाळी 10 वाजता संशयित प्रमोद शंकर पाटणकर, नामदेव दिनकर पाटणकर, भैय्या रामा सोनवणे, भैय्याचा लहान भाऊ (नाव, गाव माहित नाही) यांनी फिर्यादी वैभवसह त्याचे वडिल किशोर भोळे यांना मारहाण केली तसेच वडिल किशोर यांच्या डोक्यात संशयित दिनकरने काहीतरी टोकदार वस्तू मारून दुखापत केली. तपास नाईक प्रदीप इंगळे करीत आहेत.
