भुसावळात फॉर्च्युनरच्या धडकेत दोघे दुचाकीस्वार गंभीर जखमी
Two bikers seriously injured in collision with Fortuner in Bhusawal भुसावळ : भरधाव फॉर्च्युनर कारने उडवल्याने लग्नाला निघालेले दोघे दुचाकीस्वार जखमी झाले. हा अपघात राष्ट्रीय महामार्गावरील राधाकृष्ण हॉटेल जवळ मंगळवारी संध्याकाळी साडेसात वाजता घडला.
नियंत्रण सुटल्याने वाहन युवकांवर आदळले
या अपघातात इरफान शेख (वय 25, रा. निंभोरा बुद्रूक, ता. भुसावळ) व त्यांच्या सोबत गौतम वाघ (वय 30, रा. कपिल वस्ती) हे दोघे जखमी झाले. दोघे मित्र दुचाकीने (एम.एच.19 सी.बी.2679) ने लग्नाला जाण्यासाठी मित्राची वाट पाहत उड्डाणपुलाच्या कडेला उभे असताना वरणगावकडून आलेली भरधाव (एम.एच.04 ई.डी.0445) ने दोन्ही जणांना जबर धडक दिल्याने दोघे तरुण जखमी झाले तर दुचाकीचा चुराडा झाला. बाजारपेठ पोलिसांनी धाव घेतली.
