श्री क्षेत्र कोथळी येथे धाडसी घरफोडी : 52 हजारांचा ऐवज लंपास
Daring house burglary in Sri Kshetra Kothali : 52 thousand instead of loot भुसावळ : श्री क्षेत्र कोथळी येथे बंद घरातून चोरट्यांनी 52 हजार 500 रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना सोमवारी पहाटे उघडकीस आली. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
घर बंद असल्याची साधली संधी
कोथळी येथे आशा रमेश वराडे या वास्तव्यास आहेत. कुटूंब गावाला गेल्याने घराला कुलूप असल्याची संधी चोरट्यांनी साधली. रविवार, 14 रोजी रात्री 10 ते सोमवार, 15 रोजी पहाटे सातदरम्यान घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश करीत कपाटातील पाच ग्रॅम वजनाची व 25 हजार रुपये किंमतीची सोन्याची अंगठी, अडीच हजार रुपये किंमतीचे चार सोन्याचे मणी तसेच 25 हजारांची रोकड लांबवली. सोमवारी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर निलेश निनू वराडे (42, कोथळी) यांनी मुक्ताईनगर पोलिसात धाव तक्रार दिल्यानंतर अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक निरीक्षक संदीप दुनगहू यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार जाधव करीत आहेत.
