जाब विचारल्याच्या रागातून चारठाण्यातील वयोवृद्धास मारहाण : सात संशयितांविरोधात गुन्हा


Elderly man in Charthana was beaten up out of anger for asking for a jab: Crime against seven suspects मुक्ताईनगर : विहिरीतील मोटारची वायर तोडून मोटार का बंद केली ? अशी विचारणा केल्याच्या रागातून चारठाणा येथील शेतकर्‍याला शेतात मारहाण करण्यात आली. या प्रकरणी सात संशयिताविरोधात मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

सात संशयितांविरोधात गुन्हा
नामदेव दिनकर पाटणकर (38, चारठाणा) यांच्या तक्रारीनुसार, वरील कारणावरून संशयित आरोपींनी सोमवारी दुपारी बारा वाजता चारठाणा गावातील शेत गट क्रमांक 281/04 मध्ये चारचाकीने येवून डोक्यात काठीने येवून मारहाण करीत शिविगाळ केली. या प्रकरणी संशयित किशोर नारायण भोळे, दिलीप नारायण भोळे, सचिन दिलीप भोळे, नामदेव धोंडू फेगडे, महेश जनार्दन भोळे, वैभव किशोर भोळे (सर्व रा.चारठाणा) व दिलीप भोळे यांचा जावई (नाव, गाव माहित नाही) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास नाईक प्रदीप इंगळे करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !