भुसावळनजीक भीषण अपघात : निंभोर्‍यातील युवक जागीच ठार


Horrific accident near Bhusawal : Youth from Nimbhora killed on the spot भुसावळ : भरधाव फॉर्च्युनर कारने उडवल्याने लग्नाला निघालेल्या दोघा युवकांपैकी एकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्गावरील राधाकृष्ण हॉटेलजवळ मंगळवारी संध्याकाळी साडेसात वाजता घडली. अपघातानंतर जमावाने फॉच्युनर चालकास ताब्यात घेत बाजारपेठ पोलिसांना माहिती दिली. या अपघातात शेख इरफान शेख रहेमान (28, रा.निंभोरा बुद्रूक, ता.भुसावळ) याचा जागीच मृत्यू झाला तर सहकारी मित्र गौतम प्रल्हाद वाघ (30, रा.कपिल वस्ती, भुसावळ) हा जखमी झाला आहे.

चारचाकी चालकाविरोधात गुन्हा
मंगळवारी सायंकाळी उड्डाण पुलाखाली शेख ईरफान व गौतम वाघ हे दुचाकी (एम.एच.19 सी.बी.2679) ने लग्नाला जाण्यासाठी मित्राची वाट पाहत उभे असताानाच वरणगावकडून जळगावकडे निघालेलली भरधाव फॉच्युनर (एम.एच.04 ई.डी.0445) ने दोन्ही जणांसह दुचाकीला जबर धडक दिल्याने शेख ईरफानचा जागीच मृत्यू ओढवला तर मित्र गौतम वाघ हा गंभीर जखमी झाला होता. धडक इतकी जोरदार होती की दुचाकीचा चुराडा झाला तर चारचाकी वाहनाचेही मोठे नुकसान झाले. तरुणाच्या मृत्यू प्रकरणी गोविंदा प्रमोद पाटील (38, साकरी, ता.भुसावळ) यांच्या फिर्यादीवरून फॉर्च्युनरवरील चारचाकी चालकाविरोधात बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार नेव्हील बाटले करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !