हावडा मेलमध्ये चोरी : न्यायालयाच्या आदेशाने 42 हजारांचा मुद्देमाल फिर्यादीला सुपूर्द


भुसावळ : डाऊन 12809 मुंबई-हावडा मेल एक्स्प्रेसमधून बदरजहा मोहम्मद रफीक (55, मोमीनपूरा, भानखेडा, रा.नागपूर) या बोगी क्रमांक एस-4 च्या सीट नंबर 33 व 36 वरून प्रवास करीत असताना चोरट्यांनी 42 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल असलेली पर्स लांबवली होती. भुसावळ रेल्वे स्थानकावरील प्लॅटफार्म क्रमांक पाचवर 26 डिसेंबर 2019 रोजी 4.20 वाजता ही घटना घडली होती. या प्रकरणी लोहमार्ग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपी सोपान प्रल्हाद भिवटे (28, रा.खिरोडा, ता.संग्रामपूर, जि.बुलढाणा) यास पोलिस निरीक्षक दिनकर डंबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय पौर्णिमा राखुंडे ,सुनील पाटील, मधुकर नाव्हकर यांनी अटक केली होती. आरोपीच्या ताब्यातून 40 हजारांच्या 14 ग्रॅमच्या चार सोन्याच्या अंगठ्या, एक हजारांचा मोबाईल आदी मिळून एकूण 42 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. भुसावळ रेल्वे न्यायालयाच्या आदेशानुसार तक्रारदाराला हा मुद्देमाल परत करण्यात आला.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !