जुन्या आठवणींमध्ये रमले रेल्वे सुरक्षा बल कर्मचारी


भुसावळात आरपीएफच्या 2005 मधील कर्मचार्‍यांचा मेळावा : बॅचमेटांनी एकमेकांना कडाडून मारली मिठी

भुसावळ : रेल्वे सुरक्षा बलात 2005 मध्ये भरती झालेल्या कर्मचार्‍यांचा मेळावा शहरातील तनारीका रीसोर्टमध्ये नुकताच झाला. याप्रसंगी 15 वर्षानंतर सोबत नोकरीला लागलेल्या सहकार्‍यांनी एकमेकांना मिठी मारत आनंदाश्रूंना वाट मोकळी करून दिली. जम्मू काश्मिरातील कठुआ येथे रेल्वे सुरक्षा बलाच्या 38 व्या तुकडीची 2005 मध्ये निवड प्रक्रिया झाली होती मात्र त्यानंतर ठिकठिकाणी सोबतच्या सहकार्‍यांची नियुक्ती झाल्याने भेटण्याचा योग जुळून येत नसल्याने रेल्वे सुरक्षा बलातील आरक्षक रंजन तेलंग, कुंदन नेगी, ईकबाल शेख, शिवाजी ढेगे तसेच सुमित सिंग आदींनी पुढाकार एकाचवेळी भरती झालेल्या सर्व सहकार्‍यांना एकत्र बोलावून मेळावा घेण्याचे निश्‍चित केले व 12 जून रोजी तो योगही जुळून आला. देशभरात नोकरीनिमित्त विखुरलेले सहकारी तब्बल 15 वर्षानंतर समोरा-समोर आल्यानंतर त्यांनी आनंदाने एकमेकांना कडाडून मिठी मारली तसेच जुन्या आठवणींना प्रसंगी उजाळा देत कुटुंबाची ख्याली-खुशालीही विचारली. संपूर्ण भारतातून सुमारे शंभरावर आरपीएफ कर्मचारी प्रसंगी उपस्थित होते. यावेळी आरपीएफच्या वेलफेयर संबंधी चर्चा करण्यात आली. पाणावलेल्या डोळ्यांनी एकमेकांना निरोप देत लवकरच पुन्हा अशाच पद्धत्तीचा विराट मेळावा घेण्याचे निश्‍चित केले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !