रीगाव शिवारात ऊस तोडणी मजुरांना आढळले बिबट्याचे बछडे


मुक्ताईनगर : तालुक्यातील रीगाव शिवारात शेतात ऊस तोडणी मजुरांना बिबट्याचे दोन बछडे आढळल्यो खळबळ उडाली आहे. शेती शिवारातील बिबट्याच्या उपस्थितीने शेती कशी कसायची ? या विवंचनेत शेतकरी असून वन विभागाने बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकर्‍यांकडून होत आहे. रीगाव गावापासून काही अंतरावर असलेल्या गट क्र. 8 मधील संतोष विटे यांच्या शेतात सकाळी दहा वाजेच्या दरम्यान अचानक बिबट्याचे दोन बछडे खेळताना आढळले मात्र कानोसा घेतला असता मादी आढळली नाही.  या घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मादी आणि तिच्या पिल्लांची हालचाल टिपण्यासाठी त्यांनी आजूबाजूच्या परीसरात कॅमरे लावले आहेत. मादी पिल्लांना सुरक्षित स्थळी नेईपर्यंत सर्व घडामोडींवर लक्ष ठेवले जाणार असून बिबट्यांची मादी जर आलीच नाही तर या पिल्लांच्या सुरक्षेसाठी वन विभागाकडून पर्यायी पावले उचलली जातील, तोपर्यंत शेतकरी व नागरीरकांनी सहकार्य करण्याचे आवाहन वनक्षेत्रपाल अमोल चव्हाण यांनी केले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !