महागाईचा भडका : शेंगदाणा व सोयाबीन तेल शंभरीपार
रावेर : गोर-गरीबांच्या चटणीवरील तेलाचा भडका उडाला असून सोयाबीन व शेंगदाणा तेल शंभरीच्या पार पोहचले आहे हा भाव आतापर्यंतचा सवाच्च असल्याने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. एकीकडे वाढती बेरोजगारी तर दुसरीकडे पोटाची खळगी भरणे महाग झाले आहे यामुळे गृहिणींमधून संताप व्यक्त होत आहे.
नववर्षात 18 टक्के वाढ
सर्वत्र महागाईचा भडाका उडाला असून अनेक गरीब कुटुंबाच्या घरच्या कर्ता असलेल्या माणसांच्या हाताला काम मिळत नाही तर दुसरीकडे सोयाबीनच्या उपन्नात प्रचंड घट झाली असून बेरोजगारी वाढली असतांनाच तेलानेदेखील भडका धरला आहे. सोयाबीन तेल गतवर्षी 80 रुपये किलो होते तर नवीन वर्ष उजळताच सोयाबीन तेलाने शंभरी गाठली. तेलावर सुमारे 18 टक्क्यांची वाढ झाली असून नागरीकांमधून संताप व्यक्त होत आहे. गतवर्षी ऑगस्ट महिन्यांमध्ये सोयाबीन तेल 85 रुपये किलो होते त्यानंतर सुमारे 18 टक्के तेलावर वाढ झाली असून 106 रुपये किलोपर्यंत तेल पोहोचले आहे. आणखी तेलाच्या दरात वाढ होवू शकते, असा अंदाज व्यापारी वर्तवत आहेत. दरम्यान,
सर्वत्र महागाईचा भडका उडाल्याने शासनाने रेशन दुकानांद्वारे तेल व सर्व प्रकारच्या दाळी उपलब्ध करण्याची मागणी अर्थतज्ञ जयंत भागवत यांनी केली आहे.



