भुसावळ शहरातील हिरा हॉल भागात धाडसी घरफोडी : दिड लाखांची रोकड लंपास


Daring house burglary in Hira Hall area of Bhusawal city : Cash of one and a half lakhs looted भुसावळ : बनावट चावीद्वारे घराचे कुलूप उघडून चोरट्यांनी कपाटातील दिड लाखांची रोकड लांबवल्याचा धक्कादायक प्रकार ईदगाह कॉलनीजवळील हिरा हॉल परीसरात मंगळवारी घडला. या घटनेने खळबळ उडाली असून चोरटा माहितगार असल्याचा यंत्रणेचा संशय आहे. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

भरदिवसा चोरी झाल्याचा संशय
पेंटर व्यावसायीक शेख शफी शेख साबीर (33) हिरा हॉलमागे वास्तव्यास आहेत. ते कामानिमित्त बाहेर गेल्यानंतर चोरट्यांनी बनावट चावीद्वारे कुलूप उघडून किचनमधील लोखंडी कपाटातून दिड लाखांची रोकड लांबवली. हा प्रकार मंगळवार, 30 मे रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी सहा दरम्यान घडला. तपास सहाय्यक निरीक्षक मंगेश गोंटला करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !