जळगावच्या स्टेट बँकेतील पावणेचार कोटींच्या दरोड्याची अखेर उकल : त्रिकूट जाळ्यात

जळगाव गुन्हे शाखेसह शनीपेठ पोलिसांची दमदार कामगिरी : सायकांळी आरोपींची नावे स्पष्ट होणार


Jalgaon State Bank Robbery of 54 Crores Finally Solved  जळगाव :  एखाद्या चित्रपटात दर्शवल्याप्रमाणेच रेकी करून आलेल्या दरोडेखोरांनी अवघ्या 15 मिनिटात बँक मॅनेजरसह कर्मचार्‍यांना बंधक बनवत 17 लाखांच्या रोकडसह तीन कोटी 60 लाखांचे सोने लुटल्याची घटना जळगावातील कालिका माता मंदिराजवळील स्टेट बँकेत गुरुवार, 1 जून रोजी सकाळी 10 वाजता घडली होती. अत्यंत गुंतागुंतीचा व कुठलाही पुरावा नसलेला दरोडा पोलीस यंत्रणेने उघडकीस आणला आहे. या प्रकरणी तीन संशयीतांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडील गुन्ह्यातील मोठ्या प्रमाणावर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. बँक कर्मचार्‍यानेच अन्य दोन साथीदारांच्या मदतीने दरोडा घडवून आणल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक एम.राजकुमार हेसायंकाळी याबाबत पत्रकार परीषद घेवून सविस्तर माहिती देणार आहेत.





अवघ्या पंधरा मिनिटात लुटली होती बँक
जळगावच्या कालिका माता मंदिर परीसरातील काशीबाई उखाजी कोल्हे विद्यालयाच्या नजीक स्टेट बँक ऑफ इंडियाची शाखेत गुरुवारी सकाळी दोन दरोडेखोरांनी बँकेच्या पाठीमागून कर्मचार्‍यांसाठी असलेल्या दरवाजातून प्रवेश करीत कॅश इन्चार्ज देवेंद्र नाईक, हाऊस किपिंग मनोज सूर्यवंशी व सिक्युरीटी गार्ड संजय गोविंदा बोखारे आदींना बंधक बनवत तोंडावर टेप लावून बांधून ठेवले तर मॅनेजर राहुल महाजन (37, एम.जे.कॉलेजसमोर, जळगाव) हे गुरुवारी 9.45 वाजता दाखल होताच त्यांच्यावर स्प्रे मारत मारहाण करीत त्यांच्याकडील चाव्यांद्वारेसोबत लॉकरमधील 17 लाख 10 हजार 370 रुपयांची रोकड तसेच तीन कोटी 60 लाख रुपयांचे बँकेत तारण ठेवलेले सहा किलो 16 ग्रॅम वजनाचे दागिणे काळ्या बॅगेत टाकून मॅनेजरच्या दुचाकी (एम.एच.19 बी.ई.2778) ने धूम ठोकली होती.

पोलिसांनी कारवाईबाबत राखली गुप्तता
भरदिवसा पडलेल्या दरोड्यामुळे पोलीस यंत्रणेवर टिकेची झोड उठली होती. जिल्हा पोलीस अधीक्षक स्वतः बँकेत तळ ठोकून होते शिवाय त्यांनी अहोरात्र अधिकार्‍यांना तपासाबाबत सातत्याने सूचना व मार्गदर्शन केले. एक-एक बारीक कडी जोडत पोलिस संशयितांपर्यंत पोहोचले मात्र एकही पोलीस कर्मचारी वा अधिकार्‍यांनी गेल्या दोन दिवसात माध्यम प्रतिनिधींचे फोन उचलले नाहीत वा कुठलीही माहिती बाहेर पडू न देण्याची काळजी घेतली हे देखील विशेष. अखेर तीनही संशयितांना अटक करण्यात व मुद्देमालाची रीकव्हरी करण्यात यश आल्यानंतर यंत्रणेला दिलासा मिळाला आहे.

यांचे दरोडा उकलकामी परीश्रम
जिल्हा पोलीस अधीक्षक एम.राजकुमार, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव एलसीबीचे वरीष्ठ निरीक्षक किसनराव नजन-पाटील, शनीपेठचे निरीक्षक शंकर शेळके व त्यांच्या अधीनस्त अधिकारी व कर्मचार्‍यांनी डोळ्यात तेल घालून रात्रं-दिवस एक करीत आरोपींचा माग काढत अखेर त्यांच्या मुसक्या बांधल्या. दरम्यान, सायंकाळी पाच वाजता जिल्हा पोलीस अधीक्षक दरोड्याची पत्रकार परीषदेत माहिती देणार असल्यानंतरच आरोपींची नावे व दरोड्याबाबत सविस्तर माहिती कळू शकणार आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !