ओडिशात रेल्वे अपघातातील मृतांची संख्या 261 वर


Death toll in Odisha train accident rises to 261 नवी दिल्ली :  रेल्वेच्या इतिहासात गेल्या 20 सर्वाधिक मोठा रेल्वे अपघात ओडिशा राज्यात घडला आहे. शुक्रवार, 2 जून रोजी रात्री कोरोमंडल एक्स्प्रेस, हावडा एक्स्प्रेस आणि मालगाडीची टक्कर झाल्यानंतर आतापर्यंत 261 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची बातमी समारे आली आहे तर आणखीन मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. रेल्वेच्या इतिहासात गेल्या दोन दशकातील हा सर्वाधिक अपघात ठरला आहे.

900 वर प्रवासी जखमी
सूत्रांच्या माहितीनुसार, कोरोमंडल एक्स्प्रेस आणि मालगाडीची टक्कर झाली. दोन ट्रेन्स आणि मालगाडीची धडक यांचा अपघात झाला. या अपघातातील मृतांची संख्या 261 इतकी असून 900 प्रवासी जखमी आहेत. सुरुवातीला मृतांची संख्या 30 व नंतर 50 तर आता 261 वर मृतांचा आकडा पोहोचला आहे तर आणखी आकडेवारी वाढण्याची भीती आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या प्रकरणी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या राजीनाम्याची मागणी केली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अपघातानंतर शोक व्यक्त केला.





पंतप्रधानांनी बोलावली बैठक
ओडिशाच्या बालासोर येथे शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या रेल्वे अपघातात 261 जणांचा मृत्यू झाला, तर 900 हून अधिक प्रवासी जखमी झाले. बालासोर येथील बहानागा बाजार स्थानकाजवळ सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. कोलकाता-चेन्नईकडे जाणारी कोरोमंडल एक्सप्रेस आणि यशवंतपूर-हावडा एक्सप्रेस बहानागाजवळ रुळावरून घसरली. यानंतर कोरोमंडल ट्रेल मालगाडीला धडकली. या अपघाताबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी तातडीची बैठक बोलावली.

असा घडला अपघात !
पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, एका रेल्वे अधिकार्‍याने सांगितले की, सर्वप्रथम यशवंतपूर-हावडा एक्सप्रेस रुळावरून घसरली. त्याचे काही डबे दुसर्‍या रुळावरून उलटले आणि दुसर्‍या बाजूने येणार्‍या शालिमार-चेन्नई कोरोमंडल एक्सप्रेसला धडकले. यानंतर कोरोमंडल ट्रेनच्या काही बोगीही रुळावरून घसरल्या. या बोगी दुसर्‍या ट्रॅकवर असलेल्या मालगाडीला धडकल्या. काही बोगी मालगाडीच्या वर चढल्या.

प्रवासी काही क्षणात पोहोचणार मात्र तोच गाठले मृत्यू
ट्रेन क्रमांक 12864 बेंगळुरू – हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेस 1 जून रोजी सकाळी 7.30 वाजता बेंगळुरूमधील यशवंतपूर स्थानकावरून निघाली. 2 जून रोजी रात्री 8 च्या सुमारास हावडा येथे पोहोचणार होती. नियोजित वेळेपेक्षा 3.30 तासांच्या विलंबाने 06.30 वाजता भद्रक येथे ही गाडी पोहोचली. पुढचे स्टेशन बालासोर होते, जिथे ट्रेन चार तासांच्या विलंबाने 7.52 वाजता पोहोचणार होती मात्र त्यापूर्वीच अपघात होवून प्रवासी ठार झाले. ट्रेन क्रमांक 12841 शालीमार-चेन्नई सेंट्रल कोरोमंडल एक्सप्रेस हावडाहून 2 जून रोजी दुपारी 3.20 वाजता निघाली. 3 जून रोजी दुपारी 4.50 वाजता चेन्नई सेंट्रलला पोहोचते मात्र उशिर झाल्याने संध्याकाळी 6.37 वाजता बालासोरला पोहोचली. पुढचे स्टेशन भद्रक होते जिथे ट्रेन 7.40 ला पोहोचणार होती मात्र सात वाजण्याच्या सुमारास बहानागा बाजार स्थानकाजवळ दोन्ही गाड्या समोरासमोर गेल्यानंतर हा अपघात झाला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !