प्रवाशांना दिलासा : नागपूर-राजकोट दरम्यान विशेष रेल्वेगाडी


भुसावळ : मध्य रेल्वे प्रशासनाने नागपूर राजकोट दरम्यान विशेष गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या गाडीमुळे प्रवाशांना सुविधा मिळणार आहे. मध्य रेल्वे प्रशासनातर्फे नागपूर-राजकोट या मार्गावर 20 जानेवारी ते 30 मार्चपर्यंत विशेष गाडी चालवली जाणार आहे. 01207 अप नागपूर राजकोट एक्स्प्रेस ही विशेष गाडी दर सोमवारी नागपूर येथून रात्री 7.50 वाजता सुटणार आहे. दुसर्‍या दिवशी सायंकाळी 6.30 वाजता ही गाडी राजकोटला पोहोचेल. डाउन 01208 राजकोट नागपूर विशेष गाडी ही गाडी दर मंगळवारी, 1 जानेवारी ते 31 मार्च या काळात राजकोट येथून रात्री 10 वाजता सुटणार आहे. ही गाडी दुसर्‍या दिवशी रात्री 10.15 वाजता ही नागपूरला पोहोचेल. गाडीला वर्धा, बडनेरा, अकोला, भुसावळ, जळगाव, धरणगाव, अमळनेर, नंदुरबार, सूरत, भरूच, बडोदा, आनंद, अहमदाबाद, वीरमगम, सुरेंद्रनगर येथे थांबा आहे. या गाडीला एक एसी द्वितीय, तीन एसी तृतीय आणि नऊ आरक्षित कोच राहणार आहेत. प्रवाशांनी गाडीचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !