ओडिशातील रेल्वेचा तिहेरी अपघात : मध्यरात्रीपासून वाहतुकीला सुरूवाती
Triple train accident in Odisha : Traffic resumes from midnight नवी दिल्ली : ओडिशातील बालासोर येथे 2 जून रोजी सायंकाळी कोरोमंडल एक्सप्रेस, दुरांतो व मालगाडीत अपघात होवून 278 प्रवाशांचा मृत्यू ओढवला होता. रेल्वे अपघातानंतर यंत्रणेतेने तातडीने रेल्वे रूळांच्या दुरुस्तीचे काम हाती घेतल्यानंतर रविवारी रात्री उशिरापासून गाड्यांची वाहतूक सुरू झाली आहे. दुसरीकडे, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव 2 जूनपासून बालासोरच्या बहनगा बाजार स्टेशनवर थांबून होते. दरम्यान, अपघातानंरत 51 तासांनंतर जेव्हा पहिली ट्रेन रुळावरून रवाना झाली तेव्हा रेल्वेमंत्री हात जोडून उभे असलेले दिसले.
तरुण चक्क जिवंत सापडला
अपघाताच्या 48 तासांनंतर रविवारी रात्री घटनास्थळावरून एक प्रवासी जिवंत सापडला असून अपघातानंतर तो बाहेर फेकला जावून काटेरी झुडूपात अडकला मात्र तो बेशुद्ध असल्याने त्याला उपचारार्थ हलवण्यात आले. या घटनेत त्याचा फोन आणि पाकीट गायब झाले आहे.




288 नव्हे तर 275 जणांचा मृत्यू
ओडिशाचे मुख्य सचिव प्रदीप जेना यांच्या दाव्यानुसार 288 नव्हे तर 275 जणांचा मृत्यू झाला. काही मृतदेहांची पुर्नमोजणी करण्यात आल्याने मृतांच्या संख्येत तफावत असल्याचे त्यांनी सांगितले. या अपघातात 1175 जण जखमी झाले असून त्यापैकी 793 जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले.