मुक्ताईनगर शहर खुनाने हादरले : मयत रावेर तालुक्यातील रहिवासी !
Muktainagar city rocked by murder: Residents of Raver taluka dead !
रावेर तालुक्यातील तरुणाचा निर्घृण खून
मुक्ताईनगर : शहरातील श्री संत मुक्ताई मंदिरामागील रस्त्याच्या कडेला तरुणाचा खून करून मृतदेह फेकून देण्यात आल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली आहे. मयत तरुण रावेर तालुक्यातील असल्याची माहिती आहे. मयताची अद्याप ओळख पटलेली नसल्याने पोलिसांकडून ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.
तीक्ष्ण हत्याराने वार करीत खून
मुक्ताईनगर शहराजवळील श्री संत मुक्ताई मंदिराच्या मागील बाजूस बोदवड रोडला लागूनच मंगळवारी सकाळी एका तरुणाचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह पडून असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर यंत्रणेने धाव घेतली. मयत तरुणाच्या शरीरावर तीक्ष्ण हत्याराने तसेच दगड वा तत्सम वस्तूने वार केल्याने घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर रक्ताचा सडा आढळला. सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप दुनगहू यांनी आपल्या सहकार्यांसह घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी मृतदेहाचा पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी हलवला. मयत तरुण रावेर तालुक्यातील असल्याचा यंत्रणेला संशय आहे.
