जळगावात महिलेस विवस्त्र करीत चोरट्यांचा पाच लाखांच्या ऐवजावर डल्ला
गणपती नगरातील थरारक घटना : तिघा संशयीत आरोपींचा शोध
जळगाव : शहरातील एका भागात राहणार्या महिलेला विवस्त्र करीत तिघा चोरट्यांनी पाच लाखांच्या ऐवजावर डल्ला मारल्याची घटना 15 जानेवारी रोजी चार वाजेच्या सुमारास घडली. दुपारी चार वाजेच्या सुमारास अज्ञात दोन व्यक्ती आणि एक महिलने घरात घुसून पिडीत महिलेला मारहाण करीत तिचे हातपाय बांधून विवस्त्र केले व घरातील प्रॉपर्टीचे कागदपत्र, चार लाखाची रोकड व सोने-चांदीचे दागिने असा एकूण पाच लाखांचा मुद्देमाल लांबवला. पीडीतेने आरडाओरड करण्याचा प्रयत्न केला असता जीवे ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर कागदपत्र आणि रोकड घेऊन तिघे पसार झाले. पीडीतेने शुक्रवारी सकाळी रामानंद नगर पोलीस स्टेशन गाठून घडलेली हकीकत सांगताच तिघा अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. परीसरातील सीसीटीव्ही कॅमेर्याच्या आधारावरून रामानंद पोलिसांनी चौकशीला सुरुवात केली आहे. तिघा चोरट्यांनी चार लाख रुपये रोख, 60 हजार रुपये किमतीचे चार तोळे वजनाच्या चर बांगड्या, 15 हजार रुपये किमतीचे 1 तोळे वजनाचे मंगळसूत्र, 15 हजार रुपये किमतीचे 6 सोन्याच्या अंगठ्या आणि 300 रुपयाचे प्लॉट खरेदी खत, असे एकूण 5 लाख रुपयांचा मुद्देमाल लांबवला.
