भुसावळात अतिक्रमण हटवताना औषधांसह पालिका दवाखान्यातील साहित्य लांबवले
भुसावळ : महामार्ग चौपदरीकरणासाठी गुरुवारी दीनदयाल नगरात 99 घरे जमीनदोस्त करण्यात आली. मोहिमेला सुरुवात करताना नगरपालिकेचे प्राथमिक आरोग्य केंद्र पाडण्यात आले मात्र या दवाखान्यात असलेली औषधी, पंखा, चॅनल गेट व दरवाजा आदी साहित्य पालिका प्रशासन वा संबंधिताना न हलवल्याने उघड्यावर पडण्यात आलेले साहित्य बेमालूमपणे नागरीकांनी लांबवले.
‘त्या’ गोळ्यांमुळे अप्रिय घटना घडल्यास जवाबदार कोण?
दीनदयाल नगरातील घरांसोबत पालिकेचा दवाखानादेखील जमीनदोस्त करण्यात आला. काही वर्षांपूर्वीच हा दवाखाना बंद करण्यात आल्याने केवळ येथून लसीकरणाचे कामे आतापर्यंत होत होती मात्र बालकांसाठी शक्तीवर्धक (आर्यन कॅप्सुल) या दवाखान्यात ठेवण्यात आल्याची माहिती आहे. अतिक्रमण हटवताना या दवाखान्यातील मोठ्या प्रमाणावरील औषधी दवाखान्याबाहेर टाकण्यात आल्याने अनेक नागरीकांनी बेमालुमपणे त्या घटनास्थळावरून उचलल्या त्यामुळे या औषधी कालबाह्य झाल्या होत्या की वापरण्यायोग्य होत्या हे कळण्यास मार्ग नाही शिवाय या औषधांच्या सेवनातून काही गैरप्रकार घडल्यास जवाबदार कोण? असादेखील प्रश्न उपस्थित होत आहे. आरोग्य विभागाचा भोंगळ कारभारही यातून उघड झाला असून या प्रकाराची चौकशी करण्यासह दोषींवर कारवाई होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. पालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.किर्ती फलटणकर म्हणाल्या की, दवाखाना काही वर्षांपूर्वीच बंद झाला असून तेथे आर्यन गोळ्या असाव्यात, या भागात सर्वे करून ज्यांनी गोळ्या नेल्या असतील त्यांना त्या परत करण्याच्या सूचना केल्या जातील, असे
त्या म्हणाल्या.



