यावलमध्ये सीएए व एनआरसीविरोधात धरणे आंदोलन
यावल : शहरातील तहसील कार्यालयाबाहेर शुक्रवारी संविधान बचाव समितीतर्फे धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात सर्वधर्मीय बांधवांसह महिलांचा मोठा सहभाग राहिला. शुक्रवारी दुपारी दोन वाजेपासुन सातोद रस्त्यावर असलेल्या नवीन तहसील कार्यालयासमोरील शशीकांत सखाराम चौधरी कन्या शाळेच्या समोरील प्रांगणात आंदोलक यायला सुरवात झाली. तीन वाजता आंदोलन सुरू करण्यात आले. यात सीएए, एनपीआर व एन.सी.आर कायदा रद्द करण्याची मागणी करीत घोषणा देण्यात आले.
यांचा आंदोलनात सहभाग
यावेळी फरहा नाज, अॅड.नितीन रजाने, राष्ट्रवादीचे विजय पाटील, सैय्यद आसमा, हाजी शब्बीर खान, प्रदीप सपकाळे, सोहेल आमीन, मौलाना गुलाम अहेमद रजा, मो.हाजी याकुब शेख सह मान्यवरांनी येथे आंदोलकांना संबोधीत केले. यात सोहेल आमीन म्हणाले की, या देशात स्वातंत्र्यासाठी मुस्लिमांनी देखील बलिदान दिले असून आज त्यांच्याकडे पुरावे मागुन त्यांच्यावर हा एका प्रकारे अन्याय केला जात आहे. पाच आंदोलनकर्त्यांचे शिष्टमंडळ तहसील कार्यालयात गेले व तिथे तहसीलदार जितेंद्र कुंवर यांना सदरील कायदे रद्द करण्याच्या मागणीचे निवेदन देण्यात आले. आंदोलनात हाजी शब्बीर खान, हाजी ताहेर शेख चाँद, शेख हकीम शेख अलाउद्दीन, जिल्हा परीषदेचे गटनेता प्रभाकर सोनवणे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रा.मुकेश येवले, प्रमोद पारधे, अनिल जंजाळे, पंकज तायडे, नगरसेवक मनोहर सोनवणे, गौतम अडकमोल, अताउल्ला खान, शेख आलीम शेख रफीक, शेख हकीम हाजी शेख याकूब, पंकज तायडे, शेख असलम शेख नबी, गौतम अडकमोल, शेख सईद शेख रशीद, बबलु तायडे, इकबाल खान रशीद खान, मो.शफी रफीयोद्यीन, शेख मजहर, इकबाल खान, मोहसीन खान गफुर खान, अजहर शेख सह संविधान बचाव समितीचे मोठ्या प्रमाणावर पदाधिकारी व कार्यकर्त्यांची प्रसंगी उपस्थिती होती.



