भुसावळात दुचाकी चोरटे सैराट : दररोजच्या चोर्यांनी वाहनधारकांमध्ये घबराट
Two-wheeler thieves in Bhusawal : Panic among motorists due to daily thieves भुसावळ : शहरातील जवाहर डेअरीजवळून चोरट्यांनी 20 हजार रुपये किंमतीची दुचाकी लांबवली. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
वाढत्या चोर्यांमुळे वाहनधारकांमध्ये भीती
गाडरीया भावसिंग मेहता (29, अमृत कॉलनी, शिरपूर कन्हारोड, भुसावळ) यांनी दुचाकी (एम.पी.10 एन.ओ.361) ही आठवडे बाजारातील जवाहर डेअरीजवळ पार्क केली होती मात्र चोरट्यांनी रविवारी दुपारी तीन वाजता संधी साधली. तपास नाईक महेश चौधरी करीत आहेत.
दरम्यान, शहरात दररोज होणार्या दुचाकींच्या चोर्यांमुळे वाहनधारकांमध्ये घबराट पसरली असून पोलीस यंत्रणा चोरट्यांचा बंदोबस्त करण्यात सपशेल अपयशी ठरली आहे.
